शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्ता अखेर ‘नॅशनल हायवे’कडे! : अधिसूचना जारी, सहापदरीकरणाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:49 IST

सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या दुरुस्तीवरून रस्ते बचाव कृती समितीने उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी अखेर यश आले.

सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या दुरुस्तीवरून रस्ते बचाव कृती समितीने उभारलेल्या आंदोलनाला गुरुवारी अखेर यश आले. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (नॅशनल हायवे) वर्ग झाला आहे. याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध केली. त्यामुळे या रस्त्याच्या नूतनीकरणासह सहापदरीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे.वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता चर्चेत आला. या रस्त्यावर खड्डे चुकविताना काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सांगलीपासून पेठपर्यंतच्या गावांतील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून आंदोलन हाती घेतले.दिवाळीच्या पहिल्या दिवशी या रस्त्यावरील खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची तीव्रता वाढवत नेली. अखेर हा रस्ता डिसेंबरअखेर खड्डेमुक्त न झाल्यास ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हायवे’ असे नामकरण करण्याचा इशाराही कृती समितीने दिला. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने पॅचवर्कचे काम हाती घेतले होते. पण रस्त्याची दुर्दशा पाहता, पॅचवर्क करून त्याची दुरुस्ती होणारी नाही, हा रस्ता नव्यानेच करण्याची गरज आहे. त्यातच शासनाने सांगली-पेठ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मंजूर केला होता. महामार्ग प्राधिकरणनेही या रस्त्याचा सर्व्हे केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्ग प्राधिकरणकडे हा रस्ता हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण त्याला मूर्त स्वरुप येत नव्हते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी रस्ता हस्तांतरणासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाला गुरुवारी अखेर यश आले.हस्तांतरण लवकरच होणारदोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांनी सांगली-पेठ रस्त्याची पाहणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची लांबी, त्यावरील शासकीय मालमत्ता, फलक, झाडे यांची माहिती घेतली होती. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. लवकरच रस्त्यासंदर्भातील कागदपत्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द केली जातील, असे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.